पैडी येथे दोन दिवसीय जिल्हा स्तरीय ग्रामसभा सम्मेलन संपन्न

एटापल्ली,: .२० व २१ जानेवारी २०२० रोजी वेनसरा ग्राम सभा इ लाक्या तील पैडी येथे जिल्हा स्तरीय ग्रामसभा संमेलन आयोजित करण्यात आले.२४ डिसेंबर पेसा दिवसाच्या निमित्याने जिल्ह्यातील सर्व आदिवासी समुदायाचे महा सम्मेलनात ज्येष्ठ समाजसेवक तिरु. देवाजी तोफा , ति. नामदेवराव उसेंडी मा. आ.यांचे व अन्य मान्यवरांचे मोलाचे मार्ग दर्शन लाभले. गडचिरोली जिल्ह्यातील विविध भागातून आलेल्या ग्रामसभा प्रतिनिधींची बैठक होऊन विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाली व ग्रामसभां चे सशक्ती करण करणे, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून म्हणजेच कोया ,गोंडी भाषेतून उपलब्ध करून देणे, धर्मांतरित आदिवासी लोकांना आदिवासींचे सांवैधानिक अधिकार देवू नये,स्व शासनाचे अधिकार बहाल करणे, आंतर जातीय विवाह केलेल्या मुलींना वडीलांकडील कायदे शीर वारसान हक्क बहाल न करणे,खनिज व वनांचे सामूहिक मालकी हक्क प्रदान करणे,जातीचे दाखले /जात वैधता प्र माणपत्र देतांना ग्रामसभां नी दिलेले दाखले विचारात घेणे इ.विषयांवर सविस्तर विचार होऊन ठराव पारित करण्यात आले.या प्रसंगी ति. सैनुजी गोटा, राजू गो माडी,नितीन पदा,डॉ. कोडापे , अनिल मडावी,रावण गावडे, नंदू म ट्टामी इ.उपस्थित होते.कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी पैडी येथील गावकरी, युवक,युवती, महिला मंडळे यांनी अथक परिश्रम केले.