
भामरागड:आदिवासी बांधवांचे पवित्र दैवत पहांदी पारी कुपरलिंगो हे होय. त्यांचे प्रतीक असलेले पवित्र चिन्ह हे गडचिरोली जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावांमध्ये आपणास पहावयास मिळते. असे एक प्रतीक लाहेरी मध्ये प्रवेश करताच आपल्या निदर्शनास येईल. ग्रामस्थांनी उभा केलेले हे पवित्र प्रतीक समस्त ग्रामस्थांचे श्रद्धास्थानी आहे. कालौघात प्रत्येक कलाकृतीचे जीर्णोद्धार , सौंदर्यीकरण करणे क्रमप्राप्त असते. असेच सौंदर्यीकरण व रंगरंगोटी अतिदुर्गम , आदिवासीबहुल लाहेरी येथे करण्यात आली. उप पो स्टे लाहेरी चे प्रभारी अधिकारी अविनाश नळेगावकर यांनी आपल्या पोलीस अमलदारांचे सोबत सदर प्रतिकाचे सौंदर्यीकरण व रंगरंगोटी केली तसेच आजूबाजूचा परिसर व बाजार चौक परिसराचीही यावेळी स्वछता केली. इतक्यात मौ लष्कर येथील महिला व मुले हे काही कामानिमित्त पायी चालत लाहेरीत आल्याचे अविनाश नळेगावकर यांना समजले. त्यांनी या आगंतुक पाहुण्यांना तात्काळ निमंत्रण दिले. त्यांना अल्पोपहाराची सोय करण्यात आली व सामाजिक बांधिलकीची जाणीव म्हणून सर्व महिलांना साडी व मुलांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले व पवित्र देवतेस कृतीतून वंदन करण्यात आले.
त्यावेळी पोहवा तुकाराम हिचमी, शालू नामेवर, अरुण टेकाम, पोशी सचिन सोयाम, संदीप आत्राम, पुरुषोत्तम कुमरे, ईश्वरलाल नैताम, चिरंजीव दुर्गे, अभिषेक पिपरे, मोहीन मानकर, वैशाली चव्हाण,कल्यानी मेश्राम, सुजाता जुमनाके, प्रेमीला तुलावी, प्रणाली कांबळे, यांनी परिश्रम घेतले आहे.