नगरपंचायत मुख्य अधिकाऱ्याकडून ई-टेंडरिंग चां घोळ

  1. गोंडपिपरी:- नगरपंचायतीच्या प्रभारी मुख्याधिकारी यांनी चालवलेल्या बेबंद शाहीचा गाडा थांबता थांबेना कारण मागील पाच वर्षे आधी गोंडपिपरी शहराला नगरपंचायत चा दर्जा प्राप्त झाला व गावाचा विकास झपाट्याने सुरू झाला अशातच मुख्याधिकारी डॉक्टर माधुरी सलामे यांची बदली होता च नेहमीच वादग्रस्त असलेल्या गडचंदुर येथील मुख्याधिकारी विशाखा शेळकी यांच्याकडे तात्पुरत्या प्रभार देण्यात आला प्रभात घे ताच आपल्या वादग्रस्त कार्यपद्धतीचे दर्शन घडविणे सुरू केले नगरपंचाय तिच्या घनकचरा व्यवस्थापनाचे निविदा काढण्यात आल्या त्यात स्व मर्जीतील कंत्राटदार भूषण ईटणकर यांना कंत्राट कशा पद्धतीने देता येईल यासाठी पुरेपूर प्रयत्न करीत सर्व नियम धाब्यावर बसवून त्यांना कंत्राट देण्याचे ठरविले

 

 

 

महत्वाचे म्हणजे गोंधळी नगर पंचायत येथील घनकचरा व्यवस्थापनासाठी एकूण सहा कंत्राटदारांनी निविदा दाखल केल्या त्या तिघांना मुख्याधिकारी यांनी सो मर्जीने अपात्र केले व उर्वरित तिघांनाही कागदपत्रांच्या अभावी अपात्र केले व सर्व कंत्राटदारांना अनामत रक्कम परत त्यांचे स्वतःचे खात्यात वळती केल्या व नंतर सहापैकी. मर्जीतील कंत्राटदारांना ऑफलाइन बोलून पात्र घोषित केले व ही प्रक्रिया राबवताना नगरपंचायतीचा कंत्राट असताना गडचांदूर नगरपरिषदे चा कागदपत्रे व स्टॅम्प वापरून संभ्रम निर्माण करीत. प्रक्रिया राबवली यामुळे नगरपंचायती वर आज घडीला प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे या सर्व बाबींवर गोंडपिपरी नगरपंचायत मधील लागलेला डाग पुसून काढण्यासाठी स्थायी समितीने एक विरुद्ध चारणे विरोध केला असून घनकचरा व्यवस्थापनाची निविदा पारदर्शकपणे पुनश्च काढण्यात यावी व कंत्राटदारांना सर्वसमावेशक न्याय देऊन प्रक्रिया राबवावी. अशी मागणी केलेली आहे महत्त्वाचे म्हणजे या मुख्य अधिकाऱ्याकडून जिवती , कोरपणा, राजुरा, व आता गोंडपिपरी येथे एकाच कंत्राटदाराला चुकीच्या पद्धतीने कंत्राट मिळवून दिले गेलेले आहे हे या सर्वच नगरपरिषदांमध्ये राबवलेल्या प्रक्रियांची सखोल चौकशी झाल्यास खूप मोठा घोळ चव्हाट्यावर येईल.