वाघाच्या हल्यात महिला ठार नरभक्षी वाघाला जेरबंद करण्याचे खासदार अशोक नेते यांनी दिले निर्देश

गडचिरोली- चांदाळा मार्गावरील गोटूल भूमी (जुनी कोळसा खदान ) समोरच्या झुडपी जंगल परिसरात सरपण जमा करणाऱ्या महिलेवर पट्टेदार वाघाने हल्ला करून तिला ठार मारल्याची घटना आज दि 16 डिसेंबर रोजी दुपारी दीड वाजताच्या सुमारास घडली. या घटनेची माहिती मिळताच खासदार अशोक नेते यांनी तात्काळ गडचिरोली वनवृत्ताचे मुख्यवनसंरक्षक श्री प्रवीण कुमार यांना दूरध्वनी करून सदर नरभक्षी पट्टेदार वाघास त्वरित जेरबंद करण्यासाठी यथाशीग्र उपाययोजना करून इंदिरानगर- चांदाळा रोड – पोटेगाव रोड – सेमाना देवस्थान च्या जंगल परिसरात पिंजरे लावून वाघाला त्वरित जेरबंद करण्याचे निर्देश दिले.

 

तसेच वाघाच्या हल्ल्यात मृत पावलेल्या सुधाताई चिलमवार यांच्या कुटुंबियांना शासनाकडून तात्काळ आर्थिक मदत देण्याचे निर्देशही यावेळी खासदार अशोक नेते यांनी दिले.