विदर्भ राज्य आंदोलन समिती शाखा एटापल्ली वतीने तहसीलदार मार्फत निवेदन

इशांक दहागावकर

तालुका प्रतिनिधी एटापल्ली /= महिन्यापासून एवढे लांब लागू असलेल्या लोकडाऊनमुळे सर्व नागरिकांचे कामधंदे ,व्यवसाय, रोजगार, नोकरी व इतर सर्व कामे बंद होते या कारणामुळे नागरिकांचे आर्थिक नुकसान झाले , ही महत्त्वपूर्ण बाब लक्षात शासनाच्या लक्षात यावे यासाठी विदर्भ राज्य आंदोलन समिती शाखा एटापल्ली तर्फे आज मा. प्रधानमंत्री, मा. मुख्यमंत्री, मा.उर्जा मंत्री,याना निवेदन तहसीलदार मार्फत पाठविण्यात आले या निवेदनात कोरोना काळातील वीज बिल माफ करावे,200 युनिट पर्यत नेहमीसाठी वीज मोफत द्यावे, अहेरी जिल्हा निर्माण करावे , अतिवृष्टी ची नुकसानभरपाई शेतकऱ्यांना मिळावी, कृषी पंपाचे वीज बिल माफ करावे या विषयांवर हे निवेदन होते , वरील मागण्या लवकरात लवकर पूर्ण न झाल्यास 4 जानेवारी ला ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांचा घराला घेराव करून आंदोलन करण्यात येणार ,निवेदन देताना ,श्री सचिन मोतकुरवार, श्री, महेश पुल्लूरवार, श्री प्रमोद देवतळे, श्री, निलेश पुल्लूरवार, श्री ,मारोती कांबले, श्री तानुज बालेवार, श्री, ओमकार पुज्जलवार, श्री प्रज्योत बलेवार, श्री, नेहाला बाला, व इतर समिती सदस्य उपस्थित होते