महाराष्ट्रातील नामवंत कवयित्री,गझलकार प्रा.कविता डवरे यांचे अकल्पित निधन झाले.सर्वाना या घटनेने धक्का बसला,साहित्यक्षेत्राची मोठी हानी झाली.सामाजिक,साहित्यिक,सांस्कृतिक क्षेत्रात त्यांचा वावर लक्षात घेऊन सामुहिक श्रद्धांजली अर्पण करण्याकरिता एका कार्यक्रमाचे आयोजन डॉ इंदिराताई ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली,डॉ नरेशचंद्र काठोळे,डॉ बबन सराडकर,डॉ सतीश तराळ,डॉ अशोक पळवेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत एकता महिला मंडळातर्फे करण्यात आले असून दि.५/१२/२०२० (शनिवार) रोजी दुपारी ४.३० वाजता एकता महिला मंडळ पटांगण,राठी नगर,अमरावती येथे आप्त स्नेहींनी उपस्थित रहावे.असे आवाहन आयोजक डॉ. शोभा रोकडे,डॉ.मंदा नांदूरकर व यंग बी.सी.ग्रूपच्या वतीने करण्यात आले आहे.