एटापल्ली. नुकत्याच झालेल्या नागपूर पदवीधर मतदार संघातून श्री. अभिजीत वंजारी विरुद्ध संदीप जोशी यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळाली आणि त्यात महाविकास आघाडीचे उमेदवार श्री अभिजित वंजारी भरघोस मतदीक्याने विजय प्राप्त केला
त्याबद्दल एटापल्ली येथे महाविकास आघाडीतर्फे फटाक्याच्या आतिषबाजी ने जल्लोष साजरा करण्यात आला उपस्थित महाविकास आघाडीचे जी. प. सदस्य संजय चरडूके काँग्रेस कमिटी अध्यक्ष एटापल्ली, श्री रमेश जी गंपावार न. प. उपाध्यक्ष एटापल्ली, जितेंद्र जी टिकले न .प सदस्य तथा पाणीपुरवठा सभापती एटापल्ली, विजय अतकमवार राष्ट्रवादी शहर अध्यक्ष एटापल्ली, मिथुन जोशी राष्ट्रवादी युवक जिल्हा उपाध्यक्ष गडचिरोली, तसेच राघवेंद्र सूल्व।वार युवा सेना प्रमुख एटापल्ली, निजाम पेंदाम काँग्रेस कार्यकर्ता, पंकज पुंगाटी युवक शहर अध्यक्ष राष्ट्रवादी, मनीष दुर्गे युवा सेना कार्यकर्ता ,श्रीकांत चीपावार आविस सदस्य, सचिन गड्डमवार राष्ट्रवादी युवक जिल्हा सचिव ,अमित ठाकरे ,उमेश मडावी शेकडो माहाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते