लगाम येथील प्राध्यापकांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

 

 

मुलचेरा : -तालुक्याच्या लगाम येथील शहीद बिरसा मुंडा कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक विलास चेपटूजी आंबोरकर (४९) यांचे सायंकाळी ५: ४५ वाजताच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

नेहमीप्रमाणे ते सायंकाळी ५: ३० च्या सुमारास कांचनपूर रस्त्यावर फिरायला गेले. दरम्यान त्यांना चक्कर येऊन रस्त्यावर कोसळले. लगेच त्यांना लगाम प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. २००४ पासून ते येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते.

मूळचे पळसगाव (जाट) ता. सिंदेवाही, जि. चंद्रपूर येथील रहिवासी होत. त्यांच्या अचानक जाण्याने हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली असा आप्तपरिवार आहे.