नैनपूर येथे भव्य रात्रकालीन कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन आमदार कृष्णा गजबे यांचे हस्ते संपन्न

 

देशाईगंज:
देशाईगंज नगरपरिषद क्षेत्रातील नैनपूर या ठिकाणी दिनांक ५/११/२२ ला कबड्डी स्पर्धेचे उदघाट्न आरमोरी निर्वाचन क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी मंचावर, चैतन्यदास विधाते शहर महामंत्री, पुरुषोत्तमजी भागडकर सर पत्रकार लोकमत, अण्णाजी तुपट, लालाजी रामटेके, गिरीधर कुथे, अंबादासजी कांबळे, गोपालजी चौधरी, नागोरावजी कवासे, गंगाधरजी चांदेवार, परसरामजी टिकले, देवदासजी मेश्राम, राजेश्वर सहारे, दादाजी ढोंगे, आशिष घोरमोडे, व मंडळाचे अध्यक्ष सदस्य व गावातील कबड्डी प्रेमी प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी बोलताना आ.कृष्णा गजबे म्हणाले की अलीकडील काळात लोकात जागृती होऊन कबड्डी ह्या देशी खेळाकडे तरुण वळलेले असून हा खेळ अत्यंत कमी खर्चात होत असून यातून कुस्तिगीर तयार होतात तसेंच सांघिक भावना तयार होऊन एकोप्याचे वातावरण तयार होण्यास मदत होते त्यामुळे तरुणांनी देशी खेळांना प्राधान्य क्रम द्यावे असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. यावेळी गावातील मुलाचा दर्शनी सामना घेण्यात आला.यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.