जुनी वडसा येथे भव्य रात्रकालीन कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते संपन्न

 

खेळाडूंनी आपल्या कला कौशल्यांच्या माध्यमातून देशांचे प्रतिनिधित्व करावं – आ. कृष्णा गजबे

देसाईगंज/जूनी वडसा:
छावा ग्रुप क्रीडा मंडळ वडसा जुनी येथे भव्य रात्रकालिन कबड्डी स्पर्धेचे आयोजन दिनांक 04 नोव्हेंबर 2022 रोजी करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांचे हस्ते करण्यात आले.
जिल्ह्यातील खेळाडूंनी आपल्या कौशल्यांच्या बळावर देशाचे प्रतिनिधित्व करून देशाचे व महाराष्ट्रचे तसेच आपल्या जिल्हाचे मान अधिक उंचवावे असे प्रतिपादन आ.कृष्णा गजबे यांनी भव्य रात्रकालीन कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटना प्रसंगी केले.
यावेळी सचिनभाऊ खरकाटे मा. आरोग्य सभापती न.प. देसाईगंज, मिलींदजी सपाटे, देवरावजी मेश्राम, पांडुरंगजी बगमारे, अनील बर्डे, प्रमोद हेडाऊ, नरेंद्र बर्डे, शंकररावजी जोहरी बाबू, प्रल्हाद राऊत तसेच गावातील प्रतिष्ठित मान्यवर युवक वर्ग व कबड्डी प्रेमी प्रामुख्याने उपस्थित होते.