माजी पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांच्या हस्ते ग्रामपंचायत महागाव (बूज) येथे भव्य शिलाई मशीन वितरण 

 

अहेरी तालुक्यातील ग्रामपंचायत महागाव (बूज) येथे पंधरावा वित्त आयोगा अंतर्गत महीला सक्षमीकरण या उद्देशाने १० शिलाई मशीन वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून गडचिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री मा. राजे अम्ब्रीशराव आत्राम यांची उपस्थिती होती व राजे साहेबांच्या शुभहस्ते काल १० लाभार्थ्यांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले.!

ह्यावेळी बोलतांना राजे म्हणाले, घरची महिला समोर जाईल तर घर समोर जाईल. आज आपल्या महिला पुरुषाच्या खांद्याला खांदा लाऊन समोर जात आहेत. अजून काही आर्थिक मदत लागली तर मी करिन असेही त्यांनी यावेळी म्हणाले. व स्तुत्य उपक्रम घेतल्याबद्दल ग्रामपंचायतचे अभिनंदन ही केले!

यावेळी मंचावर पुष्पा दुर्गा मडावी सरपंचा ग्रा. पं. महागाव (बूज), संजय अलोणे उपसरपंच, रविभाऊ नेलकुद्री भाजपा तालुका अध्यक्ष अहेरी, व्येकटी गंगा वेलादी प्रतिष्ठित नागरीक, सदाशीव बेंडुजी गर्गम, सामाजिक कार्यकर्ते विकास उईके नगरसेवक नगरपंचायत अहेरी, डॉ.येर्रावार साहेब प्राथमिक आरोग्य केंद्र महागाव (बूज), महादेव गंगा वेलादी प्रतिष्ठित नागरिक, श्रीनिवास मासाजी अलोणे प्रतिष्ठित नागरिक, चंद्राजी रामटेके प्रतिष्ठित नागरिक,शंकर दहागावकर सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते, यावेळी भाजपचे कार्यकर्ते आणि समस्त गावकरी उपस्थित होते..!!