4,05,000रुपयाची सोन्या चांदीची दागिणे लांबविणारी नागपूरची महिला गँग स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात

 

सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की, कौस्तुभ अशोक कठाणे रा. सराफा लाईन,वर्धा यांचे व श्याम ज्वेलर्स दुकानामध्ये दि. 24/10/21 13.30 ते 15.45 वा.च्या

 

दरम्यान बुरखाधारी दोन अनोळखी दागिणे खरेदीच्या बहाण्याने दुकानात येऊन गर्दीचा फायदा घेऊन सोन्याचे 12 पदक (वजन 58.770 ग्रॅम की.3,25000/- ) असलेला एक बॉक्स व तोरड्यांचे 18 जोड ( वजन 1262 ग्रॅम की.80,000/- )असा एकूण जु की4,05,000/- रू. चा माल चोरून नेल्याबाबत सदरचा गुन्हा नोंद करण्यात आला होता.

 

स्था. गु. शा. वर्धा मार्फत सदर गुन्ह्याचा समांतर तपास करीत असतांना तांत्रिक माहितीच्या आधारे यातील आरोपीतांना निष्पन्न करून व गोपनीयरित्या सापळा रचून त्यांना

 

आर्यनगर, नागपूर येथून ताब्यात घेऊन त्यांचे कडून वरील प्रमाणे जु.की.3,25,000 रू. चा माल जप्त करण्यात आला व त्यांना पुढील तपासकामी पो. स्टे. वर्धा शहर च्या ताब्यात देण्यात आले आहे.

यावेळी

मा. प्रशांत होळकर, पोलीस अधीक्षक वर्धा, श्री. यशवंत सोळंके,अपर पोलीस अधीक्षक, श्री. पियुष जगताप,उपविभागीय पोलीस अधिकारी, वर्धा पो.नि. श्री. संजय गायकवाड, स्था.गु. शा वर्धा यांचे मार्गदर्शनात पोउपनि. गोपाल ढोले,सौरभ घरडे पो. हवा.निरंजन वरभे, नरेंद्र डहाके, रणजित काकडे, हमीद शेख, प्रमोद पिसे, रामकिसन इप्पर, सायबर सेल चे दिनेश बोथकर, अनुप कावळे, अक्षय राऊत महिला पोलीस शाहीन बानो, शुभांगी पुसदेकर, यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.