हत्या करून रेल्वे अपघात असल्याचे भासवणारा मास्टर माईन्ड आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात

 

गुन्ह्याची माहिती या प्रमाणे आहे कि, मृतक नामें दिपक चौधरी, रा. बोरगाव मेघे, वर्धा हा शास्त्री वॉर्ड, हिंगणघाट जवळील रेल्वे पटरी वर सेल्फी काढण्याच्या नादात रेल्वे अपघाताने मयत झाला आहे अशी माहिती त्याचा मित्र दीपक यादव याचे कडून मिळाल्याने पोलीस स्टेशन रेल्वे, वर्धा येथे मर्ग क्र. ३५/२०२१ दाखल करण्यात आला होता. मा. पोलीस अधीक्षक यांनी सदर गुन्ह्याची तात्काळ दाखल घेवून स्थनिक गुन्हे शाखेला घटनास्थळी भेट देण्याचे निर्देश दिले.
सदर गुन्ह्याचे घटनास्थळी जावून पाहणी केली असता सदर अपघात हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय बळावल्याने तसेच घटनास्थळावरील स्थिती व मृतक याचा मित्र दिपक यादव याचे बोलणे व हालचाली सर्व संशयस्पद वाटतं असल्याने मृतक याचा मित्र दिपक यादव यास ताब्यात घेऊन त्याची कस्सून

विचारपूस केली व त्यास पोलीस खाक्या दाखविला असता त्याने केलेल्या निघृण खुनाची कबुली दिली व सांगितले कि त्याचा मयत मित्रा नामें दिपक चौधरी याने त्याचे साळी व पत्नीवर वाईट नजर टाकली तसेच त्याला बोलून दाखविले कि तुझी पत्नी मला खुप आवडते या गोष्टीचा राग मनात धरून आरोपी याने दिपक चौधरी यास रेल्वे पटरीवर नेऊन पहिले लोखंडी रॉडने मृतकाचे पायावर वार करून येणाऱ्या रेल्वे समोर ढकलून देऊन जीवाणीशी ठार मारले व सदर खून हा रेल्वे अपघात झाल्याबाबत परिस्थिती निर्माण केली अशी कबुली दिली. आरोपीने दिलेल्या कबुलीवरून पो.स्टे. हिंगणघाट येथे अप. क्रमांक १०४८/२०२१ कलम ३०२, २०१ भा.दं.वि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला व आरोपी दिपक उर्फ तेजसिंग यादव यास पुढील कारवाई करिता पोलीस स्टेशन हिंगणघाट यांचे ताब्यात देवून खुनाचा गुन्हा उघडकीस आणला.
सदर कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री प्रशांत होळकर, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री यशवंत सोळंके यांचे मार्गदर्शनात मा. पोलीस निरीक्षक श्री संजय गायकवाड यांचे निर्देशांप्रमाणे पोउपनि. सौरभ घरडे, पोउपनि. गोपाल ढोले, पोलीस अंमलदार स्वप्नील भारद्वाज, विकास अवचट, संघसेन कांबळे, दिनेश बोथकर, राकेश आष्टनकर, मनीष कांबळे, यांनी केली.