एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन धडकणार आता अनिल परब यांच्या घरावर

 

एसटी कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून संपावर ठाम आहेत. वारंवार आवाहन करुनही कर्मचारी कामावर येत नाहीय. आंदोलक कर्मचारी परिवहन मंत्री अनिल परब यांच्या घरावर धडकणार आहेत. संपकरी परिवहन मंत्र्यांच्या घरावर मोर्चा काढून संताप व्यक्त करणार आहेत. अनिल परबांनी पुन्हा एकदा एसटी कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याचं आवाहन केलं आहे. मात्र, त्याचा काहीही परिणाम झालेला दिसून येत नाही. त्यामुळं आता हा संप मोडीत काढण्याची तयारी राज्य सरकारनं सुरु केली आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी आगारातून खासगी बस, शालेय बस आणि वडाप सोडल्या जात आहेत. ठिकठिकाणाहून शिवशाही बसेस सुद्धा मार्गस्थ झाल्या आहेत. खासगी बस चालकांना सोबत घेऊन एसटी पूर्वपदावर आणण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे.