पाहुण्यासारख्या आलेल्या पावसाने शेतकऱ्यांचे केले अथोनाथ नुकसान

शुक्रवारी संध्याकाळच्या दरम्यान जिल्ह्यातील काही भागात पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे

 

सध्या जिल्ह्यात धान कापणीचे काम सुरू आहे. अनेक शेतकरी कापणी करून धानपीक शेतात ठेवत आहेत. त्याचबरोबर कपाशीचे पीकही शेवटच्या टप्प्यात आले आहे. अशातच एक दिवसापूर्वीच राज्याच्या विविध भागात पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली होती. त्यामुळे शुक्रवारी सकाळपासूनच आकाश ढगाळ होते. तर सायंकाळी विविध ठिकाणी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे काही भागातील शेतात ठेवलेल्या धान पिकासह कपाशी पिकाचेही नुकसान झाले आहे.

 

यंदा विविध संकटांना तोंड देत शेतकऱ्यांनी पिके सुरक्षित ठेवली होती. मात्र धान कापणीच्या काळात पावसामुळे धान भिजल्याने शेतकरी वर्ग पूर्णपणे चिंतेत पडला आहे. शुक्रवारी झालेल्या पावसाने अलग अलग परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.