गॅस गळतीमुळे घराला आग लागून संपूर्ण साहित्याची राखरांगोळी झालेल्या कुटुंबाला युवा संघर्ष मोर्चा देवळीचा मदतीचा हात

 

गणेश शेंडे तालुका प्रतिनिधी देवऴी

नाचणगाव जवळील पिपरी (खराबे ) येथे काल दु. २ वा. श्री दिनेश पंधरे यांच्या घरातील गॅस सिलेंडर गळतीमुळे अचानक आग लागली.

 

क्षणार्धात आगीने रौद्र रूप धारण करून घरातील संपूर्ण साहित्य जळून खाक झाले. अत्यंत गरीब कुटुंबाकडे केवळ १ एकर शेत असून त्यांना दोन मुली आहेत, मोठी सातवीत तर लहान मुलगी चौथीत शिकत आहे. या आगीमध्ये घरातील संपूर्ण साहित्यासह तीन शेळ्या व नुकताच कापूस विकून आलेले ४०००० रुपये,१५ ग्राम सोने, कपडे,

 

शाळेचे पुस्तके,वह्या सगळ्यांची राखरांगोळी झाली क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले व अख्खे कुटुंब उघड्यावर पडले. गावातील तरुण मुलांच्या सहकार्याने गावकऱ्यांनी आग नियंत्रणात आणली. याची माहिती तेथील पोलीस पाटील श्री सागर खोंडे यांनी शासकीय अधिकाऱ्यांसह युवा संघर्ष मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना दिली.

आज विनाविलंब युवा संघर्ष मोर्चा देवळीच्या संपूर्ण टीमने पिपरी (खराबे) हे गाव गाठत तात्काळ १ महिना पुरेल एवढा किराणा, ₹११०००/-( अकरा हजार रुपये) रोख व पिडीत कुटुंबाला अत्यावश्यक असलेले साहित्य ४ गादी, ४ चादर, ४ सोलापुरी चादर, ४ उशी, २ बकेट, २ मग, १ डस्टबीन व इतर साहित्याची छोटीशी मदत देण्यात आली.

 

मदत देतेवेळी पिडीत श्री दिनेश पंधरे यांच्या पत्नी व मुलींच्या डोळ्यात पाणी आले. यापुढेही कुठलीही मदत लागल्यास निःसंकोचपणे युवा संघर्ष मोर्चाला कळवा आम्ही मदतीस तत्पर राहू असे आश्वासन युवा संघर्ष मोर्चाचे अध्यक्ष श्री किरण ठाकरे यांनी कुटुंबाला दिले.

 

यावेळी किरण ठाकरे, प्रविण कात्रे, गौतम पोपटकर, पोलीस पाटील सागर खोंडे, वैभव नगराळे, इरफान शेख, गौरव खोपाळ,अददु शेख, रमेश डोंगरे, वृषभ गावंडे, व गावातील अनेक तरुणमंडळी उपस्थित होते.