खासदार रामदास तडस यांच्या हस्ते विविध विकास कामाचे भूमिपूजन सोहळा संपन्न

 

 

गणेश शेंडे तालुका प्रतिनिधी देवऴी

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना 2020-21 अंतर्गत व्यायामशाळा, सार्वजनिक वाचनालय व काळापुल येथील पुलाच्या बांधकामाचे भुमीपूजन

देवळीः केंद्र सरकारने कोरोना काळातसुध्दा ग्रामीण व शहरी भागाच्या सर्वांगीण विकासासाठी मोठ्या प्रमाणावर 15 व्या केन्द्रीय वित्त आयोगातुन निधी दिलेला असून अनेक योजनांच्या माध्यमातून ग्रामीण व शहरी भागाचा विकास होत आहे. त्यासोबतच प्रत्येक गावातील प्रत्येक व्यक्तीच्या हाताला काम मिळाले पाहिजे व संपूर्ण गाव एका विचाराने प्रभावित होऊन एकत्रित आला पाहिजे, तेव्हाच आपल्या गावाचा, शहराचा, राज्याचा तसेचा देशाचा विकास होईल, ग्रामीण व शहरी भागात विविध विकासात्मक योजनांची प्रभावी अंमलबजावणी झाल्यास निश्चीतच आपल्या भागाचा विकास होईल असे प्रतिपादन खासदार रामदास तडस यांनी देवळी येथील विविध भुमीपूजन प्रसंगी केले.

आज देवळी येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना 2020-21 अंतर्गत व्यायामशाळा, सार्वजनिक वाचनालय व काळापुल येथील पुलाच्या बांधकामाचे भुमीपूजन वर्धा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रामदास तडस यांच्या शुभहस्ते संपन्न झाला, कार्यक्रमाला नगराध्यक्षा श्रीमती सुचिता मडावी, उपाध्यक्ष डॅा. नरेन्द्र मदनकर, गटनेत्या सौ. शोभा रामदास तडस, बांधकाम सभापती मारोतराव मरघाडे, मुख्याधिकारी मिलींद साटोणे, उपस्थित होते.

यावेळी सभापती नंदकिशोर वैद्य, सभापती मिलिंद ठाकरे सभापती संगीता तराळे, सदस्या कल्पना ढोक, सदस्या सारिका लाकडे, सदस्या सुनीता ताडाम, सदस्या सुनीता बकाणे, सदस्या संध्या कारोटकर, स्विकृत सदस्य विजय गोमासे, रवी कारोटकर तसेच नगर परिषदेचे अधिकारी व कर्मचा-यांची उपस्थिती होती.