एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास रस्त्यावर उतरू- बी.एस.पी  प्रदेश सचिव रमेश मडावी

 

एसटी महामंडळाचे महाराष्ट्र सरकारमध्ये जो पर्यंत विलीनीकरण करण्यात येत नाही तोपर्यंत बहुजन समाज पार्टी एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी उभे आहे. वेळ पडल्यास संघर्ष करू असे बहुजन समाज पार्टीचे प्रदेश सचिव रमेश मडावी यांनी सांगितले. एसटी महामंडळाचे महाराष्ट्र सरकारमध्ये विलीनीकरण करण्यात यावे या मागणीसाठी गडचिरोली येथे १३ दिवसापासून बेमुदत संप सुरू आहे.

कर्मचाऱ्यांच्या मागण्यांन बद्दल सविस्तर चर्चा करून बहुजन समाज पार्टी गडचिरोली च्या वतीने एसटी कर्मचाऱ्यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला. एसटी महामंडळाच्या मागण्या जो पर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत बहुजन समाज पार्टीचे प्रदेश सचिव रमेश मडावी खंबीरपणे एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी उभे आहे. वेळ पडल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करू असे त्यांनी सांगितले. एसटी कर्मचाऱ्यांना दिले जाणारे वेतन व भत्ते अत्यंत कमी असून महागाईच्या काळात त्यात आपल्या कुटुंबांचे पालन पोषण करणे कठीण झाले आहे.

एसटी महामंडळाचे महाराष्ट्र सरकारमध्ये विलीनीकरण करण्याची मागणी

कर्मचाऱ्यांसाठी नव्हे तर सर्व सामान्य नागरिकांना सुधा त्याचा लाभ होईल

अशी आशा बहुजन समाज पार्टीचे प्रदेश सचिव रमेश मडावी यांनी व्यक्त केली आहे. शासनाने एसटी महामंडळाच्या मागण्या तातडीने पूर्ण कराव्या.