गडचिरोली : येथे एस.टी. महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरणाच्या मागणीसाठी उपोषण किंवा आंदोलनात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात महाराष्ट्र नवनिर्माण सेना गडचिरोली जिल्हा सहभागी झाली आहे
एसटी कर्मचाऱ्यांना सातत्याने विलंबाने मिळणारे वेतन, आर्थिक समस्यांमुळे ३० हून अधिक कर्मचाऱ्यांनी केलेल्या आत्महत्या आणि महामंडळाच्या गैरकारभारामुळे कर्मचाऱ्यांच्या मनात निर्माण झालेला अविश्वास या गोष्टींमुळे एसटी कर्मचाऱ्यांमधील असंतोषाचा भडका उडाला आहे. आज एसटी कर्मचारी- कामगार जगला, तरच एसटी जगेल’ हे समजून घेण्याची गरज आहे. त्या करिता पदाधिकारी व मनसैनिक यांनी उपस्थित राहून जाहीर पाठिंबा व्यक्त केला,
यांची दखल घेत मनसे जिल्हाध्यक्ष राजेंद्र साळवे यांचं सूचनेनुसार निवेदन देण्यात आले यावेळी उपस्थित जिल्हा उपध्यक्ष हरीश वलादे, मनविसे जिल्हाध्यक्ष स्वप्नील वाढई, तालुकाध्यक्ष हर्षल बोरकुटे, प्राजक्त धाईत, दीपक डोंगरे, स्वप्नील अडेट्टिवार, राहुल खोबरे, आशितोष काटेंगे, संशोत नेवळकर, लिखित पीपरे, निखिल गोरे ई. उपस्थित होते