एसटी कर्मचाऱ्यांचा मोर्चा मंत्रालयावर जाताना अडकवला अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात

 

पगार आणि विविध मागण्यांसाठी राज्यभरात सुरु झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन आणखी चिघळण्याची शक्यता आहे. मागण्या मान्य करुन घेण्यासाठी आज एसटी कर्मचाऱ्यांचा धडक मोर्चा सकाळी मंत्रालयावर धडकला, यात हजारो एसटी कर्मचारी सामील असल्याचे सांगण्यात आले आहे. सदाभाऊ खोत यांना मानखुर्द चेकपोस्ट इथं अडवण्यात आले. पोलिस बंदोबस्त लावून कर्मचाऱ्यांना अडवले जात असल्याना सदाभाऊ खोत यांनी रस्त्यावर बसून निषेध केला. तसंच अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली. दुसरीकडे हे आंदोलन दडपण्यासाठी सरकारही कठोर पावले उचलताना दिसते आहे. मुंबईच्या सीमांवर एसटी कर्मचाऱ्यांना रोखण्यात येत असल्याची माहिती आहे. मानखुर्द चेकपोस्टवर कर्मचाऱ्यांना रोखण्यात येत असल्याचे सदाभाऊ खोत यांचे म्हणणे आहे. सरकारच्या या दडपशाहीविरोधात खोत यांनी रस्त्यावर बसून निषेध केला आणि अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली आहे