धनाला योग्य हमीभाव व बोनस न दिल्यास रस्त्यावर उतरु- आमदार गजबे  

 

 

धानाचा बोनस रद्द करून शेतकऱ्यांच्या जीवावर हे सरकार उठले आहे. जर धानाला योग्य भाव आणि बोनस मिळाला नाही तर राज्यातील भाजप योग्य हमीभाव व बोनस मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असे प्रतिपादन आ. कृष्णा गजबे यांनी केले.

आदिवासी विकास महामंडळाच्यावतीने आदिवासी विविध कार्यकारी संस्थेंतर्गत देलनवाडी येथे खरीप धानाची खरेदी होणार आहे. त्याच्या पूर्वतयारीची पाहणी करण्यासाठी आमदार कृष्णा गजबे यांनी देलनवाडी केंद्राला भेट दिली. यावेळी शेतकऱ्यांनी खरिपाच्या धान्य खरेदीसाठी केंद्र कधी सुरू होणार यावर्षी सरकार धानाला बोनस देणार देलनवाडी येथे खरेदी केंद्राची पाहणी करताना आहे की नाही, असे अनेक प्रश्न विचारले. यावर आमदार गजबे म्हणाले की, राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोरोनाचे कारण पुढे करून बोनस देण्याचे टाळत आहे. धानाला योग्य हमीभाव आणि बोनस मिळाल्याशिवाय राज्यातील विरोधी पक्ष भारतीय जनता पक्ष स्वस्थ बसणार नाही. बोनस मिळण्यासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला. यावेळी रामहरी चौधरी, भास्कर घोडमारे, संस्थेचे उपसभापती रत्नाकर घाईत तसेच देलनवाडी, मानापूर नागरवाही, सुकाळा येथील शेतकरी उपस्थित होते.