विद्यार्थ्यांचे हे यश कौतुकास्पद – नगराध्यक्ष प्रशांत सव्वालाखे आर्वी शहरातील 3 विद्यार्थी नीट परीक्षेत यशस्वी

 

आर्वी ही गुणवान रत्नांची खान असुन जिद्द व चिकाटीने आर्वीतील विद्यार्थी देशपातळीवर यश संपादन करत आहेत. विद्यार्थ्यांचे हे यश कौतुकास्पद असल्याचे नगराध्यक्ष प्रशांत सव्वालाखे यांनी सांगितले. नुकत्याच जाहिर झालेल्या नीट परीक्षेच्या निकालात आर्वी शहरातील 3 विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले असून त्यांची निवड एमबीबीएस साठी झालेली आहे. नीट परीक्षेत प्रावीण्य प्राप्त 3 विद्यार्थ्यांचा नगराध्यक्ष प्रशांत सव्वालाखे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला व त्यांच्या उज्वल भविष्यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
याप्रसंगी नीटच्या परीक्षेत 649 गुण घेऊन शहरातुन प्रथम आलेला सिद्धांत नरेंद्र तुमस्कर याच्यासह उन्नती दीपक राठी (640), सम्यक राजेंद्र नखाते (615) या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
यावेळी नगरसेविका सौ उषा सोनटक्के, प्रा शिक्षक संघटनेचे दिलीप गावनेर, शेखर पालेकर, खुशाल सेलोकर, सुरेश शेळके, पुंडलिक खोपे, केशव दाऊतपुरे, करण चावरे, विद्यार्थी, पालक उपस्थित होते.
आर्वी शहर व परिसरातुन घडत असलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या उज्वल यशासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करु असेही नगराध्यक्ष प्रशांत सव्वालाखे यांनी यावेळी सांगितले.