जंगली हत्तींनी धान पिकाची केली मोठ्या प्रमाणात नासधूस शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

 

 

कुरखेडा व धानोरा तालुक्याच्या सीमेवर असलेल्या भोजगट्टा व कवडीकसा

गावाच्या परिसरात ते २१ च्या संख्येत असलेल्या जंगली हत्तींनी उच्छाद मांडून धान पिकाची मोठ्या प्रमाणात नासधूस केली. यात शेतकऱ्यांचे बरेच नुकसान झाले. याबाबत माहिती मिळताच शिवसेना जिल्हाप्रमुख (आरमोरी विधानसभा क्षेत्र) सुरेंद्रसिंह चंदेल व पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली व लवकर नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी केली.

धानोरा तालुक्यातील भोजगट्टा, कवडीकसा, मंगेवाडा, कन्हारटोला परिसरात २० ते २१ च्या संख्येने आलेल्या हत्तींच्या कळपाने शेतकऱ्यांच्या शेतात शिरून धान पिकाचे नुकसान केले. उभे पीक जमीनदोस्त झाले. धान गंजीही उपसली, तसेच भोजगट्टा येथील तीन शेतकऱ्यांची घरे पाडली. याबाबतची माहिती मिळताच शिवसेना पदाधिकाऱ्यांनी भोजगट्टा परिसराला भेट दिली. दरम्यान, धानोऱ्याचे आरएफओ केलवडकर व त्यांची चमू गस्त घालताना आढळून आली. त्यानंतर सातबाराधारक शेतकऱ्यांच्या नुकसानीचे सर्वेक्षण करण्यात आले. यावेळी वनपाल बारसागडे, संजय राठोड, आर. एस. राऊत, वनरक्षक डी. बी. आत्राम उपस्थित होते. सातबाराधारक शेतकऱ्यांसह वनहक्कधारकांच्याही पिकांचे सर्वेक्षण करावे, अशी अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल, पुंडलिक देशमुख,

अजू सय्यद, मंगेवाडा येथील ईश्वर कुमरे यांनी केली. याप्रसंगी शेतकरी

दसाराम तुमरेटी, आसाराम तुमरेटी, मसरू गावडे, सतरू गावडे, अमरू जाळे,

रावणशहा तुलावी, बहादूर हलामी, महेंद्र गावडे, केसरी गावडे यांच्यासह

परिसरातील शेतकरी उपस्थित होते.