मनोहरधाम कुष्ठरोगी संस्था दत्तपुर येथे युवा मित्रपरिवार तर्फे दिवाळीनिमित्त फराळ मिष्ठान्न वितरित

आजचा युवा समाजकार्यात पुढे यावा आणि युवकांमध्ये सामाजिक जबाबदारीची जाणीव व्हावी या उद्देशाने युवा मित्र परिवार वर्धा यांच्या पुढाकाराने आज मनोहरधाम कुष्ठरोगी संस्था दत्तपुर वर्धा येथे लक्ष्मीपुजन व फराळ मिष्ठान्न वितरण चा कार्यक्रम मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला. संस्थेच्या संपूर्ण परिवाराला दिवाळी साजरी करता यावी, हा या उपक्रमाचा मुख्य हेतू होता. या उपक्रमामध्ये संपूर्ण वातावरण प्रकाशमय सजावटीने सुशोभित करण्यात आले होते. कार्यक्रमात 70 ते 80 वृध्द व्यक्तींचा समावेश होता.
मनोहरधाम कुष्ठरोगी संस्था येथील सभागृहात लक्ष्मी मातेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाला मंचावर उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी सैनिक मा. बिपीन मोघे सर, राष्ट्रीय संचालक, जयहिंद फाउंडेशन तसेच प्रमुख अतिथी मा. प्राजक्ता मुते, अध्यक्षा, औंजळ बहुउद्देशीय संस्था वर्धा व मा. डाॅ. रुपाली मॅडम, मनोहरधाम कुष्ठरोगी संस्था वर्धा या सर्व मान्यवरांचा समावेश होता. तसेच लक्ष्मी पुजनानंतर सर्व मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले व स्वतः करत असलेल्या सामाजिक उपक्रमाची माहिती दिली. यानंतर, संपूर्ण संस्थेतील वृध्द व्यक्तींना फराळ मिष्ठान्न वितरीत करण्यात आले. तसेच काही वृध्दांना थेट वार्डमध्ये जाऊन फराळ मिष्ठान्नाचे वितरण करण्यात आले. आणि औंजळ बहुउद्देशीय संस्था मार्फत सर्वांना फळांचे वितरण करण्यात आले. व‌ दिवाळीनिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या. व सोबतच युवा मित्र परिवारातील सदस्य भुषण हिंगणकर यांचा वाढदिवस सुध्दा साजरा करण्यात आला.
संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अभिजित निनावे यांनी केले.
या सामाजिक उपक्रमामध्ये संपूर्ण युवा मित्र परिवाराचा समावेश होता. मित्र परिवारामध्ये अभिजीत निनावे, अंकुश चांदुरकर, भुषण हिंगणकर, सारंग भुयार, मुकुंद बत्रा आणि प्रगती चांदुरकर, पल्लवी कालोकार, रश्मी जोशी तसेच, अभिषेक पाटमासे, प्रिया पोगडे, व संपूर्ण औंजळ बहुउद्देशीय संस्था चे पदाधिकारी यांनी सहकार्य करून कार्यक्रम यशस्वी करण्यात हातभार लावला.
अशा संपूर्ण आनंदमय वातावरणात या सामाजिक उपक्रमाचा शेवट झाला.