पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा

 

चंद्रपूर दि. 7 नोव्हेंबर : राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याणमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

सोमवार दि.8 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी 10.30 वाजता सावली येथे आगमन व राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालय, सावली येथे तालुक्यातील पक्ष नोंदणी शुभारंभ व तालुक्यातील पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा.

दुपारी 1 वाजता सावली येथून बल्लारपूर कडे प्रयाण. दुपारी 2 वाजता बल्लारपूर येथे आगमन व श्री.अब्दुल करीम यांच्याकडे सदिच्छा भेट. दुपारी 2.30 वाजता गांधी भवन, बल्लारपूर येथे बल्लारपूर तालुक्यातील पक्ष नोंदणी शुभारंभ व तालुक्यातील पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा.

सायंकाळी 5 वाजता बल्लारपूर येथून चंद्रपूर कडे प्रयाण. सायंकाळी 5.30 वाजता शासकीय विश्रामगृह, चंद्रपूर येथे आगमन व राखीव. सायंकाळी 5.35 वाजता शासकीय विश्रामगृह, चंद्रपूर येथे इंडिया दस्तक न्यूज टीव्ही तर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रकाशित होणाऱ्या विश्वरत्न विशेषांकाचे प्रकाशन सोहळ्यास उपस्थित. सायंकाळी 6 वाजता पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा. रात्री 8.30 वाजता हिराई विश्रामगृह, ऊर्जानगर येथे आगमन व मुक्काम.

मंगळवार दि. 9 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी 10 वाजता पैनगंगा कोल माइन्स ता. कोरपना येथे आगमन व पैनगंगा कोल माईन्स विश्रामगृह येथे पैनगंगा कोल माईन्स संबंधित शेतकऱ्यांची जमीन अधिग्रहण, मोबदला व पुनर्वसन संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांसमवेत बैठक. सकाळी 11 वाजता पैनगंगा ता. कोरपना येथून चंद्रपूर कडे प्रयाण.

दुपारी 12 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात चंद्रपूर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेतील फायर फायटींग संबंधित आढावा बैठक. दुपारी 12.30 वाजता अल्ट्राटेक सिमेंट उद्योगातील कामगार आणि पर्यावरणाबाबत आढावा बैठक. दुपारी 1 वाजता कार्पेट क्लस्टर संबंधात आढावा बैठक. दुपारी 1.30 ते 2.30 वाजेपर्यंतचा वेळ राखीव. सायंकाळी 5 वाजता चंद्रपूर येथून नागपूरकडे प्रयाण.