लोहकारखाना देसाईगंजात उभारा- जेसा मोटवाणी

 

 

एटापल्ली तालुक्यातील सूरजागडच्या लोह खाणीतील कच्च्या मालावर प्रक्रिया करण्यासाठी कोनसरी येथे जागा निश्चित झाली होती त्यानंतर उद्घाटनही झाले; परंतु त्यानंतरच्या प्रक्रियेबाबत अद्यापही हालचाली दिसून येत नाही.

लोहप्रकल्प त्या ठिकाणी सुरू करण्यासाठी अडचणी असतील तर हा प्रकल्प देसाईगंज येथील दूध डेअरीच्या १,२०० एकर जागेत उभारावा, अशी मागणी माजी नगराध्यक्ष जेसा मोटवाणी यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले यांच्याकडे निवेदनातून केली.