चामोर्शी मार्गावर झालेल्या अपघातातील व्यक्तीचा अखेर मृत्यू

 

 

गडचिरोली शहरातील चामोर्शी मार्गावरील संथ बांधकामाने युवकाचा बळी घेतला आहे. २३ ऑक्टोबर रोजी चामोर्शी मार्गावरील अपघातात जखमी झालेल्या ४ युवकाचे काल ४ नोव्हेंबर रोजी ऐन दिपावलीच्या दिवशी निधन झाल्याने गडचिरोली शहरात हळहळ व्यक्त करण्यात आली. हिमांशु उमेश काबरा असे मृतक युवकाचे नांव आहे.

चामोर्शी मार्गावर महामार्गाचे बांधकाम संथगतीने सुरू असल्याने वाहतुकीची वारंवार कोंडी होत असते.

अशातच २३ ऑक्टोबर रोजी अज्ञात वाहनाने दुचाकीचालकास ठोस मारून पळ काढला होता. जखमी अवस्थेतील युवकावर गडचिरोली येथे प्राथमिक उपचार करून त्याला पुढील उपचारासाठी नागपूर येथे हलविण्यात आले होते. मात्र त्याचे ऐन दिपावलीच्या दिवशीच निधन झाले. यामुळे शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. काल ऐन लक्ष्मीपुजनाच्या दिवशी ही घटना घडल्याने शहरातील अनेक व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवली होती. अनेकांनी या अपघात प्रकरणी राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम करणाऱ्या संबंधित कंत्राटदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली जात आहे.