मनपाच्या कारवाईत ४० पीओपी मूर्ती जप्त

 

 

चंद्रपूर, ता. ३ : दीपावली व लक्ष्मीपूजनानिमित्त देवी लक्ष्मीच्या मूर्तीचे पूजन केले जाते. आज गांधी चौकासह शहरातील काही भागात पीओपी मूर्ती आढळून आल्या. चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या पथकाने ४० मूर्ती जप्त केल्या.

चंद्रपूर शहर महानरपालिकेची पर्यावरणस्नेही गणेशोत्सवाची मोहीम १०० % यशस्वी झाली होती. संपूर्ण गणेशोत्सवाच्या कालावधीत एकही पीओपी मूर्ती आढळून आली नाही. त्यामुळे पीओपी मूर्तींच्या विरोधातील हे पाऊल प्रभावी ठरले होते. परंतु, दीपावली व लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर मात्र मनपा पथकाच्या कारवाईत जवळपास ४० पीओपी मूर्ती विविध विक्रेत्यांकडून जप्त करण्यात आल्या. याउपरही कोणी मूर्तिकार अथवा विक्रेते पीओपी मूर्ती विकताना आढळून आल्यास दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा मनपाने दिला आहे. ही कारवाई मनपा आयुक्त राजेश मोहिते, अतिरिक्त आयुक्त विपीन पालीवाल, वैद्यकीय अधिकारी ङाॅ. अमोल शेळके यांच्यासह स्वच्छता निरीक्षकांनी केली.