खबरदार नागरिकांचे वीज कनेक्शन कापाल तर तुमचीही दिवाळी अंधारात जाईल मनसेचा महावीतरणाला इशारा

 

मुख्य अभियंत्याला घेराव; निषेर्धात कंदील दिला भेट

 

महाराष्ट्र नवनिर्माण सेना, नागपूर पदाधिकारी यांनी आज महावितरण कंपनीच्या विद्युत भवन कार्यालयात धडक देऊन मुख्य अभियंता श्री दिलीप दोडके यांना घेराव टाकत दिवाळीच्या सणासुदीवर नागरिकांचे वीज कनेक्शन कापणे तातडीने थांबवा अन्यथा जनतेच्या उग्र रोषाला सामोरे जावे लागेल असा इशारा देत महावितरण कंपनीच्या धोरणाचा निषेध केला. कोरोनाच्या कठीण काळात सर्वांचे आर्थिक चक्र थांबले होते, अजूनही जनता यातून सावरली नाही . ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी महाराष्ट्राच्या जनतेला वीज बिलात सवलत देऊ अशी खोटी घोषणा करून जनतेची फसवणूक केली आहे. कुठल्याही प्रकारचा दिलासा या कुचकामी सरकार आणि महावितरण कंपनीने दिला नाही. जनतेची थकीत बिले ही संपूर्णतः ऊर्जा मंत्रांच्या खोट्या आश्वासनांचे परिणाम आहेत. आधीच महागाई , कोरोना इत्यादी मुळे सामान्य जनता त्रस्त आहे. त्यात वीज कनेक्शन कापण्याचा जो सपाटा महावितरण कंपनीने लावला आहे तो माणुसकीच्या नात्याला काळीमा फासणारा आहे. जनतेला वेठीस धरून ऐन दिवाळीच्या प्रसंगी त्यांना थकीत बिलाचे दबाव तंत्र वापरून वीज कनेक्शन कापणे, सामान्य नागरिकांचे घर अंधारात ठेवण्याचे ऊर्जामंत्री व महावितरणचे षडयंत्र लज्जास्पद आहे अश्या तीव्र भावना मनसेचे प्रदेश सरचिटणीस हेमंत गडकरी यांनी श्री दोडके यांच्यासमोर मांडल्या.
यावेळी महावितरण कंपनी आर्थिक संकटाला सामोरे जात आहे, जनतेने सहकार्य करावे असे मुख्य अभियंता यांनी सांगितले असता मग महावितरण अधिकारी आणि कर्मचारी यांना दिवाळीचा बोनस, पगारवाढ कशी काय मिळाली असा प्रतिरोधक सवाल हेमंत गडकरी यांनी केला असता ते निरुत्तर झाले. महावितरणच्या आडमुठ्या धोरणामुळे थकीत बिल धारक आणि तुमचे कर्मचारी, लाईनमन यांच्यात संघर्ष होऊ लागले आहेत याला कारणीभूत सुध्दा ऊर्जामंत्री आणि महावितरण कंपनी आहे.
गरीब त्रस्त जनतेला त्रास देऊ नका, तत्काळ वीज कनेक्शन कापणे थांबवा अन्यथा तुमचीही दिवाळी अंधारात जाईल तेव्हा हा कंदील वापरावा लागेल असा सूचक इशारा देत मुख्य अभियंता यांना कंदील भेट दिला.
मनसे पदाधिकारी यांचा आक्रमक पवित्रा बघून, आपल्या भावना मी तत्काळ वरिष्ठ अधिकारी , मुंबई यांना पाठवून याविषयी स्वतः बोलतो व सकारात्मक पाठपुरावा करतो, दिवाळीत आम्ही जनतेला अंधारात ठेवणार नाही असे आश्वासन श्री दिलीप दोडके यांनी मनसेला दिले.
याप्रसंगी श्री हेमंत गडकरी यांचेसह शहर अध्यक्ष अजय ढोके व विशाल बडगे, उपशहर अध्यक्ष प्रशांत निकम व रजनीकांत जिचकार, शहर सचिव शाम पूनियानी व घनश्याम निखाडे, महिला सेना शहर अध्यक्षा सौ मनीषा पापडकर, पश्चिम विभाग अध्यक्ष चंदू लाडे, उत्तर विभाग अध्यक्ष उमेश बोरकर, द. प. विभाग अध्यक्ष तुषार गिऱ्हे, मध्य विभाग अध्यक्ष शशांक गिरडे, पूर्व विभाग अध्यक्ष उमेश उतखेडे, रोजगार सेलचे जिल्हा संघटक विक्रम गुप्ता, शहर संघटक नितीन बंगाले, वाहतूक शहर संघटक मंगेश शिंदे, .विभाग उपाध्यक्ष पवन साहू , चेतन बोरकुटे, प्रयाग नन्नावरे राजेंद्र पुराणिक , सुनील गवई, विभाग संघटक सागर लारोकर,मंगेश सुरमवार,शाखा अध्यक्ष विजय त्रिवेदी, नरेंद्र पाटील, शाम रहांगडाले, राजेश बिसेन, प्रवीण गायकवाड, सारंग खोसे, कोमल खवसे, तुषार कुंभारे, मिथीलेश मेश्राम, सचिन निमजे, अक्षय वैद्य, मनीष राणे,आकाश हिवराळे, इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.