नगरपरिषदेच्या इमारतीचा भूमिपूजन सोहळा धनत्रयोदशी च्या मुहूर्तावर संपन्न

रत्नागिरी शहरात उभारल्या जाणाऱ्या नगरपरिषदेच्या इमारतीचा भूमिपूजन सोहळा आज धनत्रयोदशी च्या मुहूर्तावर संपन्न झाला…

नगरविकास विभागाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत या वास्तूच्या बांधकामासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला असून लवकरच प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात होणार आहे. याठिकाणी आकारास येत असलेल्या भव्य इमारतीच्या माध्यमातून कोकणातील या निसर्गसंपन्न जिल्ह्याच्या विकासाचे नवे पर्व सुरू होईल, तसेच या मातीतील सर्वसामान्य माणसाचे प्रश्न या वस्तूमध्ये गेल्यावर नक्की सुटतील असा विश्वास निर्माण व्हावा अशी भावना यासमयी बोलताना व्यक्त केली.

याप्रसंगी राज्याचे उच्च तंत्रशिक्षण मंत्री मा.ना.श्री.उदय सामंत, आमदार राजन साळवी, रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी बी.एन.पाटील, रत्नागिरीचे नगराध्यक्ष प्रदीप साळवी, उप नगराध्यक्ष रोशन फाळके तसेच शिवसेनेचे पदाधिकारी, नगरसेवक, अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते