मदना येथे जनजागृती कायदेविषयक शिबिराचे आयोजन संविधानातील मूलतत्त्वे न्याय अश्या अनेक विषयावर मार्गदर्शन

 

प्रतिनिधी // उमंग शुक्ला

तालुका विधी सेवा समिती , आर्वी तर्फे पॅन इंडिया जनजागृती कार्यक्रमाअंतर्गत २ ऑक्टोबर २०२१ ते १४ नोव्हेंबर २०२१ रोजी ” आजादी का अमृत महोत्सव ” कार्यक्रम घेण्याचे ठरलेले होते त्यानूसार २ ऑक्टोबर ते ३० ऑक्टोबर २०२१ पावेतो तालूका विधी सेवा समिती आर्वी मार्फत आर्वी तालूक्यातील एकूण ७५ गावात कायदेविषयक शिबीरे व माहिती पत्रके वाटून जनजागृती करण्यात आलेली आहे . त्याच अनुषंगाने दि . ३१/१०/२१ रोजी सकाळी ११:०० वाजता “मदना” या गावी जनजागृती कायदेविषयक शिबीर घेण्यात आले व माहिती पत्रके घरोघरी वितरीत करण्यात आले . त्याचप्रमाणे ” गौरखेडा” या गावी माहिती पत्रके वितरीत करुन जनजागृती करण्यात आली . कायदेविषयक शिबीरामध्ये अध्यक्षीय भाषणामध्ये “श्रीमती टी . एस . गायगोले “अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती , आर्वी यांनी तालुका विधी सेवा समिती मार्फत राबविण्यात येणा – या विविध सेवा व मोफत सहाय्याविषयी माहिती दिली . त्याचप्रमाणे भारतीय संविधानातील मुलतत्वे न्याय , समता , बंधूता तसेच मूलभूत अधिकार व कर्तव्य या बद्दल सविस्तर मार्गदर्शन केले तसेच त्यांनी विकलांगता अधिनियम , स्त्री शिक्षणाचे महत्व , अटक झालेल्या व्यक्तीचे अधिकार , बाल लैंगिक अत्याचार कायदा , भृण हत्या कायदा , कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंध कायदा अशा वेगवेगळ्या कायदयांचे मार्गदर्शन केले . सदरचे कार्यक्रमास  “श्री . तिरभाने अधिवक्ता आर्वी” यांनी जन्म मृत्यू नोंद कायदा , महिला हक्क , अंधश्रध्दा निमूर्लन कायदा , प्रौढ व्यक्ती संदर्भातील कायदा , तसेच महसूलच्या विविध शासन योजने संदर्भात मार्गदर्शन केले . सदर कार्यक्रमास ग्राम सेवक ,ग्रामपंचायतचे सरपंच व इतर पदाधिकारी तथा मोठ्या संख्येन गावकरी हजर होते .
त्यानंतर न्यायाधिश , अधिवक्ता , विधीस्वयंमसेवक , न्यायालयीन कर्मचारी , ग्रामसेवक , सरपंच इत्यादीने घरोघरी जावून माहितीपत्रके वाटली व कायदेविषयक जनजागृतीच्या कार्यक्रमास सहकार्य केले .