मी आज इथून पाणी पिऊनच जाईन- सामाजिक कार्यकर्ता गौरव जाजू काय आहे प्रकरण सविस्तर वाचा

 

प्रतिनिधी // उमंग शुक्ला

आर्वी शहारातील गणपती वार्ड येथील सहेली जनरल ,सुरेश ठाकुर यांचे घरा पासून ते मोहन पालीवाल यांचे घरा पर्यन्त चे नागरिकांना पाण्याची पुष्कळ टंचई असून अनेक दिवसा पासून आतोनात त्रास होता.
अनेक वेळा वारंवार नागरिक कार्यालयात जाऊंन सुद्धा कोणताही परिणाम होत नव्हता
गणपती वार्ड मधील नागरिकांनी शेवटी त्रासुन जाऊन सामाजिक कार्यकर्ता गौरव जाजू यांना ह्या त्रासा पासून अवगत केले.
तेव्हाच लगेच गौरव जाजू यांनी मोक्यावर पोहोचुन महारष्ट्र जीवन प्राधिकरण चे अधिकारी व कंट्रातदारा सोबत संपर्क साधुन तात्काळ संबंधित परिसरात पाइप लाइन चे कार्य तेव्हाच्या तेव्हाच सुरु करून पूर्ण करायला सांगितले व *””आज मी येथून नवीन पाइप लाइन चे पानी पिउनच येथून जाणार त्या शिवाय येथून जाणार नाही””* हे सांगितले.
परिणामतः तेव्हाच्या तेव्हाच कंट्रातदारा द्वारे मोठ्या प्रमाणात मजूर,पाइप ,कनेक्शन जोडण्याची मशीन,छोटा पोकलैंड सह संपूर्ण ताफ़ा मोक्यावर पाठवून काम सुरु केले.
एकाच दिवसात काम पूर्ण करण्यात आले व अनेक दिवसा पासुनची नागरिकांची पाण्या साठीची भटकांती थांबली.