आनंदवनाच्या डॉ शीतल आमटे यांची आत्महत्या

चंद्रपूर:- आनंदवन येथील महारोगी सेवा समितीच्या कार्यकारी अधिकारी डॉ . शीतल आमटे यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे . वरोरा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले . स्वतःला विषारी इंजेक्शन टोचून घेतल्याची प्राथमिक माहिती वैद्यकीय अधिकारी सूत्राने दिली . मृत्यूचे नेमके कारण अद्याप पुढे आले नाही . डॉ . शितल आमटे या आनंदवनातील महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संचालक मंडळाच्या सदस्य होत्या .