एटापल्ली :- ज्या लाभार्थ्यांनी घरकुलाचा पहिला हप्ता उचलला आहे.मात्र बांधकाम सुरू केले नाही अशा लाभार्थ्यांना कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ देऊ नये,कोणतेही दाखले देऊ नये व तसेच तेंदूपत्ता बोनसचे वितरण करू नये असे निर्देश एटापल्ली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी किशोर गज्जलवार यांनी ग्रामपंचायतींना दिले आहेत.
ज्या नागरिकांकडे पक्के घर नाही अशा नागरिकांना प्रवर्गनिहाय प्रधानमंत्री आवास योजना,रमाई घरकुल योजना,शबरी घरकुल योजना आदी योजनांतर्गत घरकुल मंजूर केले जाते.घराच्या बांधकामाची सुरवात करण्यासाठी शासनामार्फत पहिला हप्ता संबंधित लाभार्थ्यांचा बँक खात्यामध्ये जमा केला जाते.
मात्र काही लाभार्थी या रकमेतून घर न बांधता ही रक्कम इतर कामांवर खर्च करतात.अनेक वेळा निर्देश देऊनही या लाभार्त्यांनी घरकुलाच्या बांधकामाला सुरवात केली नाही.ही एक प्रकारे शासनाची फसवणूक आहे.त्यामुळे शासकीय अनुदानाचा गैरवापर करणाऱ्या या लाभार्थ्यांना कोणताही शासकीय योजनेचा लाभ देऊ नये,तसेच दाखले सुद्धा देऊ नये असे पत्र गटविकास अधिकारी किशोर गज्जलवार यांनी दिले.
त्यामुळे अनुदानाचा दुरुपयोग करण्याऱ्या लाभार्थ्यांची चांगलीच गोची होणार आहे पण जे लाभार्थी घर पूर्ण स्वरूपात आहे त्यांचे हप्ते का नाही येतोय त्यांच्या खात्यात हप्ते न आल्याने घरकुल लाभार्थी त्रस्त झाले आहे