आष्टी-मार्कंडा(कंसोबा) रोडवरील जंगलात तरुणाचा मृतदेह आढळला.        हत्या झाल्याचा संशय

आष्टी-मार्कंडा(कंसोबा) रोडवरील जंगलात तरुणाचा मृतदेह आढळला.

 

हत्या झाल्याचा संशय

 

आष्टी-

 

आष्टी आलापल्ली रोडवरील जंगलात तरुणाचा मृतदेह आढळला असून शंका कुशंका ना पेव फुटले आहे.

मृतकाचे नाव गणेश शामराव बोलगोडवार वय २६ वर्ष राहणार कुनघाडा (माल) असे असून चपराळा अभयारण्य कम्पार्मेंट नंबर २२२ , आष्टी ते मार्कंडा (कं) रोडवर मुख्य रस्त्यापासून जंगलात १००मीटर अंतरावर मृतदेह पडून होता.व मृतकाची दुचाकी रोडवर उभी ठेवण्यात आली होती आणि तीची चाबी मृतकाचे खिशात आढळून आली.

गणेश हा काल २५ ला सेतू केंद्रात जातो म्हणून घरुन निघाला होता.तो सायंकाळी ६ वाजता पर्यंत मोबाईल वर संम्पर्कात होता मात्र आज घटनास्थळी मोबाईल त्याचे जवळ दिसून आला नाही .व अंगावर शर्ट नव्हता तो मृतदेहाचे जवळ होता.

सदर घटनेची माहिती आज १ वाजता चे सुमारास पोलिसांना मिळाली त्यावरुन सहाय्यक पोलीस निरीक्षक सखाराम बिराजदार यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामिण रुग्णालय आष्टी येथे पाठविण्यात आला . शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

मात्र मृत्यू चे कारण गुलदस्त्यात असून आष्टी पोलीस अधीक तपास करीत आहेत.

मृतकाची आई राधाबाई हिने माझ्या मुलाची हत्या झाल्याचे म्हटले आहे.