लक्ष्मण नाल्याजवळील जंगल परिसरात इसमाची गळफास घेऊन आत्महत्या

 

 

अहेरी : तालुक्यातील लक्ष्मण नाल्याजवळील जंगल परिसरात एका इसमाचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे

सविस्तर वृत्त या प्रमाणे आहे की वैभव सहारे नामक इसम हा भगवाणपुर येथील रहिवासी असून तो आपल्या पत्नी सोबत सासुरवाडी नागेपल्ली येथे आला होता तो दारू पिऊन आल्यानंतर त्याच्या पत्नीने घरी जाण्यासाठी सांगितले परंतु तो गावी परतला नाही दरम्यान त्यांने रात्रीच्या सुमारास अहेरी येथील लक्ष्मण नाल्याजवळील जंगल परिसरात झाडा ला गळफास घेऊन आत्महत्या केली सदर घटनेची नोंद अहेरी पोलीस स्टेशन मध्ये करण्यात आली या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत वैभव च्या आत्महत्येचा नेमकं कारण अजून पर्यंत कळले नाही