सर्व विजयी सरपंच व सदस्यांचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी केले अभिनंदन
पारडी कूपी, दुर्गापुर , घोट व मुरगाव ग्रामपंचायतीवर भाजपाचा झेंडा
भाजपाला कौल दिल्याबद्दल मतदारांचे मानले आभार
दिनांक १८ऑक्टोबर २०२२ गडचिरोली
गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल हाती आले असून निवडणूक झालेल्या ४ ही ग्रामपंचायती पैकी ४ ही ग्रामपंचायत वर भारतीय जनता पार्टीचे सरपंच निवडून आले असून पुन्हा एकदा भाजपाने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.
विजयी सर्व उमेदवारांचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी अभिनंदन केले असून भाजपाला निवडून दिल्याबद्दल सर्व मतदारांचेही त्यांनी आभार मानले आहे.
गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील, चामोर्शी तालुक्यातील घोट व दुर्गापुर धानोरा तालुक्यातील मुरगाव गडचिरोली तालुक्यातील पारडी कूपी या ठिकाणी थेट सरळ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या निवडणूकीचे निकाल हाती आले असून पारडी कूपी येथे भाजपाचे संजय गजानन निखारे, दुर्गापूर येथे सोनी गणेश मंडल, घोट येथे रूपाली प्रशांत दुधबावरे, तर मोरगाव येथे मारुती गेडाम सरपंच म्हणून विजय झाले आहेत.
गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील धानोरा तालुक्यातील लेखा व जप्पी येथे बिनविरोध सरपंच निवडणुक पार पडली असून कामतळा येथे कोणीही फार्म न भरल्याने निवडणूकच झालेली नाही
गडचिरोली विधानसभा क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा भाजपाने आपले वर्चस्व सिद्ध केले असून आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी सर्व विजयी उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन करीत जनतेला धन्यवाद दिले आहे.