💬 जगभरात प्रसिद्ध असणारे इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सॲप आता लवकरच व्यावसायिक वापरकर्त्यांसाठी म्हणजे व्हॉट्सॲप बिझनेस वापरणाऱ्या यूजर्ससाठी खास फिचर आणणार आहे.
🔎 व्हॉट्सॲप बिझनेस यूजरकरता प्रीमियम पेड सबस्क्रिप्शन सेवा अधिकृतपणे सुरू करणार आहे. यामुळे लोकांना व्यवसाय डिजिटल वाढवण्यासाठी मदत होणार आहे.
💁♂️ जाणून घ्या सविस्तर
📱 यामध्ये यूजर्सना कॉन्टॅक्ट लिंक कस्टमाइज करता येणार असून यूजरला एकाच नंबरवरून 10 मोबाईलमध्ये किंवा डिव्हाईसमध्ये आपले व्हॉट्सॲप अकाऊंट ओपन करता येणार आहे.
🖥️ याशिवाय झूम व गूगल मिट प्रमाणे व्हिडीओ कॉलिंगसाठी, मिटिंगसाठी व्हॉट्सॲप वापरकर्ते लिंक देखील शेअर करू शकणार आहेत.
💰 जगात काही देशांतील व्हॉट्सॲप बीटा वापरकर्ते प्रीमियम सेवा आणि संबंधित काही वैशिष्ट्यांचा लाभ घेऊ शकणार आहेत. या खास सेवेसाठी कंपनी काही चार्जेस देखील घेणार आहे. सुरुवातीला ही सेवा काही बीटा टेस्टर्स वापरकर्त्यांसाठी आणली जाणार आहे
🤔 कशी सुरु करता येईल हि सेवा – व्हॉट्सॲप बिझनेस युजर्स सेटिंग मध्ये जाऊन प्रीमियम पेड सबस्क्रिप्शन सेवा असा सेक्शन असलेल्या ठिकाणी क्लिक करून लाभ घेऊ शकतात.