राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा अविकसित,अतिसंवेदनशील क्षेत्रातील समस्यांचा निराकरणासाठी आमदार धर्मराव बाबा आत्राम 

जिल्हा प्रतिनिधी // इशांक दहागावकर

गडचिरोल्ली; अतिसंवेदनशील, अतिदुर्गम, अविकसित,भागातील शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी,शासकीय योजनेपासून वंचित नागरिकांचे विविध समस्या आवासून असून त्या समस्या जाणून घेऊन निराकरण तथा सोडवणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे गडचिरोली जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्या अध्यक्षतेखाली संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या परिवार संवाद सभा कमलापूर,छल्लेवाळा,गुंडेरा, गोविंदगाव, उमानूर येथे आयोजन करण्यात आले.

या संवाद यात्रेत सिनेट सदस्य तथा माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री आत्राम, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष ऋतुराज हलगेकर, माजी पंचायत समिती सदस्य हर्षवर्धनबाबा आत्राम, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा महासचिव कैलाश कोरेत ,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अहेरी विधानसभा प्रमुख लक्ष्मण येरावार, तालुकाध्यक्ष श्रीनिवास विरगोनवार, कमलापूरचे माजी सरपंच सांबय्या करपेत,उमानूर चे सरपंच श्रीनिवास गावडे,माजी उपसरपंच शंकर आत्राम,पराग पांढरे, उपसरपंच रविंद्र कोरेत, आनंदराव तलांडे,मांतय्या आत्राम,मोहन भट,सुमित मोतकूरवार,सत्यनारायण मेरगा,आधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी तथा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते, गावात संवाद यात्रा काढून या परिसरातील शेतकरी,शेतमजूर, वंचित आणि दुर्लक्षित नागरिकांचे मूलभूत प्रश्न व समस्या आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी जाणून घेतले.यावेळी नागरिकांनी विविध समस्या मांडले.आमदार आत्राम यांनी लगेच संबंधित अधिकाऱ्यांना भ्रमणध्वनी द्वारे संपर्क करून त्वरित समस्या सोडविण्याचे निर्देश दिले. काही समस्या वरिष्ठ पातळीवरचे असल्याने येत्या काही दिवसात त्याही समस्या सोडविण्याचे आश्वासन आमदार आत्राम यांनी दिले.

मागील दोन ते अडीच महिन्यापासून जनता दरबार,मासिक सभा,आमदार आपल्या दारी सारखे उपक्रम राबवून थेट जनतेपर्यंत जाऊन समस्या सोडविण्याचे काम सुरू असून आता परिवार संवाद यात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.त्यामुळेच संवाद यात्रा आयोजित गावातील नागरिकांनी मान्यवरांचा ढोल-ताशांच्या गजरात स्वागत केले …।