एटापल्ली:-अहेरी विधानसभा क्षेत्रातील एटापल्ली तालुक्यातील रस्त्यांची दुरावस्था झाल्याने नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत होता.अनेकदा या रस्त्यावर अपघातही झाले.नुकतेच आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला सक्तीचे निर्देश दिल्याने एटापल्ली ते कसनसूर या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे.
यावर्षी झालेल्या मुसळधार पावसामुळे अक्षरशः सर्वच रस्ते उखडले तर बहुतांश रस्त्यावर खड्ड्यांचा साम्राज्य निर्माण झाला.त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.सध्या ऑक्टोबर महिना सुरू असूनही पावसाने विश्रांती घेतली नाही.त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्त्यांच्या कामाला विलंब केला जात होता. मात्र परिसरातील नागरिकांची अडचण लक्षात घेता आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला सक्तीचे निर्देश दिल्यावर तात्काळ रस्त्यांच्या कामाला सुरुवात करण्यात आले.अहेरी विधानसभेतील अहेरी आणि एटापल्ली तालुक्यातील विविध रस्त्यांच्या कामांना सुरुवात झाल्याने नागरिकांना दिलासा मिळणार आहे.