समाज मंदीराचे लोखंडी खिडक्या चोरणारे चोरटे हिंगणघाट डी. बी. पथकाने अटक करून त्यांचेकडुन 3,62,227 रू. चा मुद्देमाल जप्त

 

हकिकत याप्रमाणे आहे की, दिनांक 11/10/2022 रोजी फिर्यादी नामे नामदेवराव लक्ष्मणराव बोरकर रा. सावली (सा.) यांनी पोलीस स्टेशन, हिंगणघाट येथे रिपोर्ट दिली कि, सावली (सा.) हिंगणघाट येथील मारोती समाज मंदीर येथे ठेवुन असलेल्या 12 लोखंडी खिडक्या एकुण किमंत 62,227 रू. चा माल दिनांक 09/10/2022 ते दिनांक 11/10/2022 रोजी दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरटयांनी चोरून नेले आहे. फिर्यादीच्या अशा तक्रारी वरून पोलीस स्टेशन, हिंगणघाट येथे अपराध क्र. 1060/2022 कलम 379 भादंवि चा गुन्हा नोंद करण्यात आला.

सदर गुन्हा नोंद होताच पोनि श्री. के. एम. पुंडकर यांनी पोहवा शेखर डोंगरे यांचे डी.बी. पथक ला माहीती दिली असता डीबी पथकाने अवघ्या 24 तासाच्या आत चोरीचा उलगडा करून आरोपी नामे 1) ओम नरेन्द्र पांडे वय 22 वर्षे रा. डांगरी वार्ड, हिंगणघाट 2) विधी संघर्षीत बालक यांना निष्पन्न करून त्यांच्या ताब्यातुन चोरीस गेलेल्या लोखंडी खिडक्या व गुन्हयात वापरलेले वाहन असा एकुण जु.कि. 3,62,227 / रू. चा माल जप्त केला. सदरचा पुढील तपास नापोशि गजानन कमठाणे हे करीत आहे.

सदरची कामगीरी मा. श्री. प्रशांत होळकर, पोलीस अधीक्षक, मा. श्री. यशवंत सोळंके, अपर पोलीस अधीक्षक, वर्धा, मा. श्री. दिनेश कदम, उपविभागीय पोलीस अधिकारी, हिंगणघाट, श्री. कैलाश पुंडकर, पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन, हिंगणघाट यांचे मार्गदर्शनात डि. बी. पथकाचे पो.हवा. शेखर डोंगरे, नापोशि. सचिन भारशंकर, निलेश तेलरांधे, सचिन घेवंदे, विशाल बंगाले, यांनी केली आहे.