बोरी व रामपूर चेक येथे राष्ट्रवादी काँग्रेस च्या जनसंवाद यात्रेचे जल्लोषात स्वागत

 

 

अहेरी -: आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी अहेरी विधानसभा मतदारसंघातील विविध गावात जाऊन जनतेसोबत संवाद साधण्यासाठी सुरू केलेली राष्ट्रवादी जनसंवाद यात्रा चौथ्या दिवशी परत बोरी व रामपूर येथे पोहोचली. या ठिकाणी गावातील नागरिकांनी ढोल ताशांच्या गजरात जनसंवाद यात्रेचे स्वागत केले. सुरुवातीला आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी ग्रामस्थांसोबत संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी, समस्या जाणून घेतली. व त्यानंतर आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी मी विधानसभा निवडणुकीत मला बोरी परीसरातील जनतेनी जी समस्या माझ्या समोर मांडले होते व मी आमदार झाल्यानंतर येथील जनतेच्या समस्या काही प्रमाणात सोडविले आहे पुढे सुद्धा ग्रामपंचायत बोरी व राजपूर पँच परिसरातील विविध गावांतील समस्या सोडविण्यासाठी कटिबध्द राहणार असल्याचे ग्वाही आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी जनसंवाद यात्रेत उपस्थित नागरीकांना केले आहे
तसेच उपस्थित नागरीकांनी आमदार धर्मरावबाबा आत्राम यांना महावितरण विभाग, एसटी महामंडळ, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग,या कडून होणारी अडचणी बाबतीत प्रश्न निर्माण केले असता आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी या सर्व समस्यांचे निराकरण येत्या काही दिवसांत करू व सदर विभागाचे अधिकारी यांना बोरी व राजपूर पँच ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांना होत असलेल्या समस्या सोडविण्यासाठी आदेश देण्यात येईल व तसेच बोरी व राजपूर पँच ग्रामपंचायत हद्दीतील शिवणीपाठ,रामपूर,ओडीगुडम,रामपूर या गावात विकास कामांसाठी असे अंजाजे २ कोटी निधी सुद्धा देण्यात आली आहे व समाज मंदिर, सिमेंट रोड,नाली,मोरी बांधकाम अश्या प्रकारे विविध कामे पूर्ण झाली आहेत असे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी जन संवाद यात्रेत उपस्थित असलेल्या नागरीकांना सांगितले आहे

यावेळी माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री त आत्राम,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष ऋतुराज हलगेकर, बोरी ग्रामपंचायत चे सरपंच श्री शंकर कोडापे,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रशांत कुतरमारे, पोलीस पाटील श्री सत्यवान मोहूर्ले, राष्ट्रवादी विधानसभा प्रमुख लक्ष्मण येरावार,अहेरी नगर पंचायत चे नगरसेवक अमोल मुक्कावार, श्रीनिवास चटारे, राष्ट्रवादी अहेरी तालुका अध्यक्ष श्रीनिवास विरोगनवारआलापल्ली ग्रामपंचायत सदस्य स्वप्नील श्रीरामवार,समाजिक कार्यकर्ते नितीन गुंडावार,किशोर खामनकर, राष्ट्रवादी युवा कार्यकर्ते महेश बाकीवार, साईनाथ मडावी, साईनाथ अलवलवार, रामाजी बद्दीवार,अशोक वासेकर, नागेश पुल्लीवार,राजपूर ग्रामपंचायत सदस्य संतोष पंदीलवार, रामपूर पोलीस पाटील लचमा पानेमवार,राजू गुंडावार,मुर्लीधर कोडशेपवार,विजय कोकीरवार, दशरथ तलांडे, काशीनाथ मोहूर्ले, संतोष येमूलवार,सुमीत मोतकूरवार,मखमूर शेख, यांच्यासह बोरी,राजपूर पँच,रामपूर चेक,शिवणीपाठ, रायपूर ओडीगुडम आदी गावातील कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

राष्ट्रवादी पक्ष हा गोर गरीब नागरिकांसाठी फायदा करणार आहे करीता संधीचा फायदा घ्या; भाग्यश्रीताई आत्राम

जन संवाद यात्रेदरम्यान परिसरातील काही नागरिकांनी जमिनीच्या पट्टेसंदर्भात भाग्यश्री ताई आत्राम यांच्यासोबत चर्चा केली. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांनी बहुतांश ठिकाणी वन हक्क पट्टे संदर्भात काम सुरू असून बोरी व राजपूर पँच परीसरातील नागरिकांनी सुद्धा पुढे येण्याची गरज आहे.राष्ट्रवादी पक्षाने स्वत पुढाकार घेऊन बोरी व राजपूर परीसरातील वनहक्क पट्टे असो किंव्हा इतर कुठलाही विषय असेल ते पुर्ण केलेला करीता आपल्यापर्यंत चालून आलेली संधीचा फायदा घ्यावे असे आवाहन भाग्यश्रीताई आत्राम यांनी केले आहे.