तालुका तर मुठीत;आता जिल्हा गाजवणार तालुका स्थरावरील अभिनव स्पर्धेत कस्तुरबा विद्यालय अव्वल

 

 

 

 

 

 

भामरागड ; राष्ट्रीय लोकसंख्या शिक्षण प्रकल्प मान्य कृती आराखडा सन २०२२-२०२३ नुसार लोकसंख्या शिक्षण विभागाने  विविध उपक्रमाचे आयोजन कडविल्यानुसार सदर स्पर्धा या तालुका जिल्हा व राज्यस्तरावर लोकनृत्य व भूमिका अभिनव स्पर्धा घेण्याचे केले आहे यातच गटसाधन केंद्र भामरागड येथे आयोजित केले असून या मध्ये भूमिका अभिनव स्पर्धा व लोकनृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते ,सदर स्पर्धेत तालुक्यातील राजे धर्मराव शाळा व कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय या दोन्ही शाळांनी भाग घेतला होता

 

या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी नृत करत कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाने प्रथम क्रमांक पठकाविला

 

व जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाची निवळ करण्यात आली

 

सदर स्पर्धेत अव्वल आलेल्या विद्यार्थिनींनी यशाचे श्रेय शिक्षिका कु.शीतल झोडे शिक्षिका, स्वीटी डोईजळ शिक्षिका,पल्लवी बनकर व आधीक्षिका भारती रोहनकर यांना दिले