आर्वी : येथील जवळेकर हॉस्पिटल ग्रुप व तसेच डॉ रोशन जवळेकर हे नेहमीच सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असतात पाहता पाहता जवळेकर हॉस्पिटलला ६ वर्ष पूर्ण झाली असून जवळेकर हॉस्पिटल हे नेहमीच सामाजिक कार्यातून वर्धापनदिन साजरा करत असतो तसेच या वर्षी सुद्धा एक सामाजिक दायित्वातून ॲम्बुलन्स सेवेकरांचा केला सत्कार
ॲम्बुलन्स सेवा ही अति महत्त्वाची ठरते पण त्याही पेक्षा ॲम्बुलन्स सेवा देणाऱ्यांचा मोठा खारीचा वाटा असतो आपले स्वतःचे वैयक्तिक प्रॉब्लेम बाजूला ठेवून ते सतत इमर्जन्सी पेशंट रेफर करण्याची काम करत असतात मात्र काम झाल्यानंतर त्यांच्याकडे दुर्लक्ष ही होतो. डॉ. रोशन जवळेकर यांच्या संकल्पनेतून अशा अहोरात्र धावणाऱ्या ॲम्बुलन्स सेवेकरांचा एक मान सन्मान सत्कार व्हावा म्हणून जवळेकर हॉस्पिटलच्या वर्धापन दिनानिमित्त डॉ. रोशन जवळेकर यांच्या हस्ते उमेश देशमुख (नवदुर्गा ॲम्बुलन्स) , शेख मोहम्मद शेख रमजान (खुशी अंबुलन्स) , पूनमचंद शि. ग्वालवंश, (कै. लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्था , ॲम्बुलन्स) आर्वी. यांचा शाल श्रीफळ व मानधन देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी जवळेकर हॉस्पिटल ग्रुपचे
पंकज गोडबोले, धनंजय घाटनासे, सुशील गायकवाड, प्रवीण देशमुख, धर्मेश अग्रवाल, प्रवीण विंचुरकर , गजाननराव जवळेकर, गुणवंत गुल्हाणे, संजय घटनासे, विजय घटनासे, संतोष संकत, व हॉस्पिटल्स नर्सिंग स्टॉप उपस्थित होते.