वासामुंडी येथील मृतक कुटुंबियांना माजी आमदार दीपक आत्राम तर्फे सांत्वन आर्थिक मदत

 

एटापल्ली: वासामुंडी येथील मारोती शांताराम तलांडे नावाचे तरुणाचा मागील जुलै महिन्यात झालेल्या मुसळधार पावसाच्या अतिवृष्टीमूळे डुम्मे नाल्यावर वाहत असलेल्या पाण्यात बुडल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.
जुलै महिन्यात मृतक मारोती तलांडे हे एटापल्ली मुख्यालयाला जाऊन आपले काम आटोपून गावी परत येत असतांना अतिवृष्टीमुळे डुम्मे नाल्यावर पाणी वाहत होता.या नाल्यावरील पाण्याचे अंदाज मृतक तरुणाला न मिळाल्याने त्या नाल्यावरील पाण्यात वाहून युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.या युवकाचा मृत्यूने तलांडे कुटुंबावर दुःखाची डोंगर कोसळली होती.

डुम्मे नाल्यावरील पाण्यात बुडून गावातील एका तरुण युवकाची दुर्दैवी मृत्यू झाल्याची वार्ता वासामुंडी गावातील नागरिकांसोबत जनसंवाद साधण्यासाठी आलेल्या माजी आमदार दिपक दादा आत्राम यांना कळताच त्यांनी मुतकाचे कुटुंबाची भेट घेऊन त्यांची सांत्वन करून व मृतकाचे कुटुंबाला आर्थिक मदत दिली.
मृतकाचे कुटुंबियांची सांत्वन व त्यांना आर्थिक मदत करतांना माजी आमदार आत्राम यांचेसमवेत माजी जि.प.सदस्य संजू भाऊ चरडुके,आविस तालुका उपाध्यक्ष श्रीकांत चिप्पावार,माजी सरपंच विजय कुसनाके,माजी सरपंच दिलीप गंजीवार, ग्रा.प.सदस्य अजयभाऊ मडावी,संदीप बडगे,गजानन मडावी गाव पाटिल, दुलसा लेकामी भूमिया,रमेश कांदो,राहुल गावडे माजी नगरसेवक, विश्वनाथ मडावी,मालू मडावी,माधव मडावी,गुरुदास आत्राम,बिखा गावडे,केशव मत्तामी,कोमटी मत्तामी,सुधाकर तेलामी सह गावकरी उपस्थित होते.

SmartSelect_20221010-073214_Facebook SmartSelect_20221010-073214_Facebook.jpg

विशाल वाळके