जिल्हा प्रतिनिधी // इशांक दहागावकर
आरमोरी ; वाघाच्या हल्ल्यात आरमोरी तालुक्यातील देशपूर येथील इसम ठार झाल्याची घटना आज ७ ऑक्टोबर रोजी सुमारे २ वाजता च्या सुमारास समोर आली आहे
सविस्तर वृत्त या प्रमाने आहे की खेमराज आत्राम हे आपल्या सहकाऱ्यांसोबत गुरे चारण्यासाठी गेला होता गुरे चारत असताना दबा धरलेल्या वाघाने अचानक त्याच्यावर हल्ला केला व काही अंतरापर्यंत त्याला नेऊन ठार केले
सदर या घटनेची माहिती गावकऱ्यांना माहिती होताच पाहण्यासाठीं गर्दी केली होती व या संदर्भात वनविभागाला माहिती देण्यात आली व वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठले