जिल्हा प्रतिनिधी // इशांक दहागावकर
आरमोरी ; आरमोरी तालुक्यातील शहराजवळच्या रामळा जंगल परिसरात दबा धरून बसलेल्या वाघाने इसमाला ठार केल्याची घटना आज ८ ऑक्टोबर रोजी दीड वाजता च्या सुमारास घडली आहे सदर मृतक इसमाचे नाव आनंदराव दुधबडे रा रामाला ता,आरमोरी असे आहे
आनंदराव दुधबडे जंगलनजीकच्या आपल्या शेतात गेले होते लपून बसलेल्या वाघाने त्यांचा वर हल्ला करून जंगलात फरकटत नेले या त्यांचे मृत्यू झाले
झालेली बाब सदर गावकऱ्यांनी वनविभागाला दिली व वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट घेऊन चौकशी करून मृतदेह विच्छेदनासाठी आरमोरी येथील उपजिल्हा रुगणालायत पाठविण्यात आले