एटापल्ली मुक्तीपथ तालुका क्लीनिक ला ९ रुग्णांची भेट

 

 

जिल्हा प्रतिनिधी // इशांक दहागावकर

एटापल्ली ; दारूचे दुष्परिणाम लक्षात येताच एटापल्ली तालुक्यातील ९ रुग्णांणी दारूच्या व्यसनातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे या साठी एटपल्ली येथील तालुक्यातील क्लीनिक ला भेट देऊन उपचार घेतला आहे

दारू मुक्त होण्याची इच्छा असलेल्या रुग्णांना उपचार मिळावे याकरिता मुक्तीपथ अभियानंतर्फे क्लीनिक चे आयोजन केले जाते आता पर्यंत क्लीनिक ला अनेक रुग्णाणी भेट देऊन उपचार घेतला आहे
अश्यातच एटापल्ली तालुक्यातील ९ रुग्णाणी उपचार घेत दारूच्या व्यसनातून मुक्त होण्याचा निर्धार केला आहे क्लीनिक ला येणाऱ्या रुग्णांना दारूमुक्त होण्यासाठी मदत व्हावी यासाठी औशोधोपचारासह समुपदेशन देखील करण्यात आले रुग्णांना दारू ची व्यसन काशी लागते शरीरावर कोणते दुष्परिणाम दिसतात धोक्याचे घटक नियमित औशोधोपचार घेणे आदींची माहिती देत समुपदेशन करण्यात आले