जगात सत्य अहिंसा प्रेम आहे, तो पर्यंत गांधी मरत नाही चंद्रकांतदादा वानखडे

 

प्रहार सोशल फोरम चे व्याख्यानमालेचे आयोजन

आर्वी तालुक्यातील दोन आक्टोबर गांधी जयंती तसेच लाल बहादूर शास्त्री, यांच्या जयंतीनिमित्त माहेश्वरी भवन आर्वी येथे गांधी विचारधारेवर, आधारित *गांधी का मरत नाही*, या सुप्रसिद्ध पुस्तकाचे लेखक चंद्रकांतदादा वानखडे, यांच्या व्याख्यानाचा जाहीर कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी स्वातंत्र्यपुर्व काळातील परीस्थितीचा आढावा घेत, गांधी, भगतसिंग, डॉ बाबासाहेब आंबेडकर, नेताजी सुभाषचंद्र बोस, पंडित जवाहरलाल नेहरू, यांचे आंतरिक वैचारिक संबंध कसे होते, गांधीजी बद्दल विदेशी महापुरुषांची आईनस्टाईन,लेनिन, चर्चिल, आणि ब्रिटिश सरकार यांची गांधीजी बद्दल काय धारणा होती, आणि इतर महापुरुषांच्या तुलनेत, त्यांंचे विचार कसे सर्व सामान्यासाठी प्रेरणादायी होते, हे पटवून दिले, पुढे बोलताना ते म्हणाले कि गांधीच्या जिवनाचा 55 वर्षाचे संघर्षमय जीवन आणि स्वातंत्र्य विषयी चा दिलेला निशस्त्र लढा, आजच्या पिढीला जाणून घेण्याची गरज आहे. गांधी स्वतः 14 वर्षाचा कारावास भोगून, जेलमध्ये असून सुध्दा लोकांच्या मनात स्वातंत्र्याची भावना धग धरत होती, त्याकाळी गांधीच्या एका शब्दावर लाखो लोक रस्त्यावर उतरायला तयार होते, आज गांधी जीवंत नसतानाही, संपूर्ण जगात त्यांचे, पुतळे असून, आजही त्यांचे विचार प्रेम, अहिंसा सत्य, त्याग, समर्पण, बलिदान, सहनशीलता, आणि समानता, हे त्याचे विचार आजही प्रेरणादायी ठरते, गांधी हे उच्च कोटीचे दुरदृष्टीचे थोर विचारवंत होते, परंतू त्याकाळातील काही नेत्यांनीच गांधीच्या खर्या, खुर्या, स्वच्छ चरीत्राचा विपर्यास करत त्यांना भेकाड, घाबरट मानसाच्या चौकटीत बसवले, उदाहरण देत ते बोलत होते, कि *मजबुरी का नाम महात्मा गांधी*

*कोणी एका गालावर मारले, त्याला दुसरा समोर करने*
इतक्यावर ते थांबले नाही तर *गांधीजी ऐय्यास होते, ढोंगी होते, व्यभिचारी होते*
असा अपप्रचार एका विशिष्ट समुदायाने गांधी विरोधात देशात पसरविण्याचे काम सुरु केले आहे, परंतु आज खर्या अर्थाने, संपूर्ण जगात त्यांचे विचार अमलात आणन्याची गरज आहे. म्हणूनच आज भारता मध्येच नाही तर
विदेशी मुद्रा, तसेच करेंशीवर सुध्दा महात्मा गांधीचा फोटो आहे. म्हणूनच गांधीना कोणी मारु शकत नाही, कारण त्यांचे विचार आजही जीवंत आहे,
असे मत सुप्रसिद्ध लेखक चंद्रकांतदादा वानखडे यांनी व्यक्त केले. प्रास्ताविक भाषणात आयोजक बाळा जगताप यांनी कार्यक्रमाची रूपरेषा व गांधी या विषयाची समाजाला विशेषतः तरुणांना असलेली आवश्यकता आपल्या शब्दात स्पष्ट केली. माजी आमदार अमर काळे, यांनी सुध्दा गांधी विचार धारेवर भाष्य केले. तसेच
इतर मान्यवरांनी महात्मा गांधी यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकला. या कार्यक्रमाचे आयोजन प्रहार सोशल फोरमचे अध्यक्ष बाळा जगताप, यांनी केले होते.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संभाजी ब्रिगेड चे श्री. आशिष जी लोहे हे होते.
कार्यक्रमाला आर्वी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार अमर काळे, विरेंद्र कडू, अँड नागेश पुजारी, पंकज वाघमारे, मोरेश्वर देशमुख, दशरथ जाधव सह पत्रकार बंधू, प्रहार सोशल फोरमचे अरसलान खान, सुधीर जाचक सर्व पदाधिकारी कार्यकर्ते, महीला भगिनी, श्रोत्यांनी भरगच्च भरलेले सभागृह सुत्रसंचालन, श्री. निलेश साव सर यांनी केले,
तर कार्यक्रमाचे समारोपीय आभार प्रदर्शन सुधीर जाचक यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मनोहर उईके, सय्यद जुनेद, राजेश आगरकर, शेख कलीम, सचिन पवनकर, हरी कळसकर, विक्रम भगत, अंकुश गोटेफोडे, रोहित घागरे, सागर दलाल यांसह असंख्य प्रहार सोशल फोरम च्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले