गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात जवळपास दोनशे लोकांना विविध प्रमाणपत्र, लायसेन्स, शेती साहित्य तसेच आत्मसमर्पित नक्षलींना सदनिकेचे वाटप….
यासमयी उपस्थितांना संबोधित करताना गडचिरोली जिल्ह्याचा विकास इतर जिल्ह्यांप्रमाणेच होईल असे नमूद करित येथील पोलिस विभाग विकासात्मक कामांना योग्य प्रकारे हाताळत असून विविध प्रकारचे मेळावे, दादालोरा खिडकी योजना यातून दुर्गम भागातील तरुणांना निश्चितच आवश्यक प्रमाणपत्रे व मार्गदर्शन मिळत असल्याचे स्पष्ट केले. यातून भविष्यात रोजगार निर्मिती होईल तसेच गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवाद कमी होत येत्या काळात गडचिरोली जिल्ह्याचे चित्र बदललेले सर्वांनाच पाहायला मिळेल असा विश्वास व्यक्त केला.
याप्रसंगी खासदार अशोक नेते, आमदार देवराव होळी, आमदार कृष्णा गजबे, जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार, जिल्हाधिकारी संजय मीना, पोलीस उप महानिरीक्षक संदीप पाटील, पोलीस अधिक्षक अंकित गोयल यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.